🌟परभणीत आयोजित बुध्दीबळ स्पर्धेत पतोडी विजेता तर बिल्पे उपविजेता....!


🌟कै.म.शं.शिवणकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्पर्धा संपन्न🌟

परभणी (दि.03 मे 2024) : येथील बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.म.शं.शिवणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या बुध्दीबळ स्पर्धेचे विजेतेपद  औरंगाबादच्या सम्यक पतोडी याने तर उपविजेतेपद परभणीच्या अभिजीत बिल्पेने पटकावले आहे.

            येथील पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात 1 व 2 जून दरम्यान संपन्न झालेल्या या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, मानवत, गंगाखेड, नाशिक, लातूर, परभणी या ठिकाणाहून आलेल्या 160 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विविध गटातील विजेत्यांना डॉ. राहुल आंबेगावकर, डॉ. धानोरकर, केशव अडणे, सिध्देश्‍वर अचींतलवार, शिवणकर गुरुजींची मानसकन्या रंजना उर्फ ज्योती साले, उदय बायस, अरुण टाक, अशोकराव शेलगावकर, अनिल शेलगावकर, धनंजय कांकरिया, संभाजी बिल्पे  यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

             प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाची नावे पुढील प्रमाणे आहेत. खुल्या गटात सम्यक पतोडी, अभिजीत बिल्पे, यसुगाडे धनंजय, हटकर सिद्धार्थ, व सचिन बिल्पे. सात वर्षाखालील गटात प्रीयल शिखरे, अक्षित विडेकर, आदित्य जोशी, रेयांश घंटे वअथर्व कृष्णा पवार. नऊ वर्षाखालील गटत्तत शौर्य मुप्पानेनी, कायरा मालानी,  वेदांश चव्हाण, स्वरा काळे  व  रुद्रांश होट्टे. तर अकरा वर्षाखालील गटात वागळे भूमिका, अद्वैत जोशी, सर्वेश भिसे,  हिंदवी यादव व सोहम कौरवार. तेरा वर्षाखालील गटात वरद बोखारे, स्वहम वाघमारे, प्रथमेश सुतार, आर्यन सोनवणे व प्रथमेश कोल्हे. पंधरा वर्षाखालील गटात ज्ञानेश्री  गावंडे, मंथन भुसा, राघव सरदेशपांडे,  सानिध्या वाघमारे व वरद बन. तसेच महिला गटात देवांश्री गावंडे, वागळे कारुण्या,  काउतकर रीया, अनुष्का चव्हाण व संचिता सोनवणे. तर ज्येष्ठ नागरिक गटात गोपाळ यंदे, खडके चंद्रशेखर वविजय वरवंटे यांचा सहभाग राहिला.

             दरम्यान, प्रथम विजेत्या पतोडी यांना रुपये 10000 , स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. तर उपविजेत्या बिल्पे यांना रुपये 7000 स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच लायन्स क्लब तर्फे 1000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह हे विशेष पारितोषिक सम्यक पातोडी यांना देण्यात आले. संभाजी बिल्पे आणि  दीपक राऊत यांनी पंच म्हणून काम पाहिले. डॉ. अनिल दिवाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आनंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या अनिल शेलगावकर, स्वप्निल कानसूरकर, धनराज कांकरिया  यांनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या