🌟सौ.चित्राताई वाघ यांची विधान परिषदेत लवकरच वर्णी : मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी म्हणून स्थान ?


🌟सौ.चित्राताई वाघ यांची कर्तव्य दक्ष व आक्रमक महिला प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता🌟 

नाशिक (प्रतिनिधी) - कुटूंबाची जबाबदारी सांभाळत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजसेवी वृत्तीने आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या मध्यमवर्गीय  कुटुंबातील गृहिणी, पुढे समाजसेविका म्हणून नावारूपास आलेल्या आणि नंतर समन्वयक, सामंजस्य, एकोपा, सलोखा आणि सौहार्द ही पंचसूत्री अंगिकरलेल्या सौ. चित्राताई वाघ यांनी राजकीय क्षेत्रातदेखील आपल्या कार्याचा सामाजिक व राजकिय ठसा उमटविला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या सध्या आपली भूमिका कर्तव्यदक्षतेने निभावत आहेत.

कलम ४११ चा फटका बसलेल्या सोनार सराफ व्यावसायिकांना त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्रातील सराफ यांना कायद्याने दिलासा मिळवून दिला आहे. जिल्हास्तरावर सोनार सराफ व्यावसायिकांसाठी दक्षता समिती नेमण्याच्या सूचना सुधारित अध्यादेश द्वारे देण्यात आल्या आहेत. या कार्याची व इतर सामाजिक राजकिय कार्याची दखल घेऊन *सौ. चित्राताई वाघ* यांना  *विधान परिषद उमेदवाराचा विचार  भारतीय जनता पक्षाने केला आहे त्या विधान परिषद सदस्य म्हणून निवडून जाव्यात, यासाठी सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मधील विविध सुवर्णकार समाज संस्था आणि  संघटना यांची मागणी पुर्ण होत आहे.

सौ.चित्राताई वाघ यांची कर्तव्य दक्ष व आक्रमक महिला प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे जाणते व माहितीगार राजकिय तज्ञान कडून संकेत  प्राप्त झाले आहेत. तसेच सौ.वाघ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या