🌟राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना....!

 


🌟या योजनेस पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन🌟 

परभणी (दि.20 जुन 2024) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. या योजनेस पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आसावा, विद्यार्थी अनुसूचित जाती/ नवबौध्द घटकातील असावा, पदव्युत्तर अभ्यासासाठी 35 व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल, विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे  (विवाहित महिला उमेदवारांनी वडीलाकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तशी कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.)  परदेशी शिष्यवृतीच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. मुलीचे  प्रवेश  अर्ज प्राप्त न  झाल्यास मुलांची यादी नुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यांस एकदाच योजनेचा लाभ घेता येईल. पदव्युतर पदवी किंवा अभ्यास उत्तीर्ण केलेला असावा, परदेशातील प्रशिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असावी. तथापि 200 मधील सिडनी, ऑस्ट्रेलिया हे विद्यापीठ योजनेतून वगळण्यात आले आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 ऑक्टोबर 2013 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, वेळोवेळी शुध्दीपत्रक निर्गमित केले आहे. या योजनेंअतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थीस देशातील प्रवेश या अभ्यासामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणिक संस्था/ विद्यापीठाचे प्रमाणपत्र गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येकासाठी सादर करणे अनिवार्य असून, अधिक माहितीसाठी www.maharastr.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज डाउनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या दिनांक 12 जुलै 2024 कार्यालयीन वेळ संध्याकाळी 6.15 पर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्चरोड पुणे- 4110001 येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या