🌟पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाच्या पाणीसाठ्यात तुरळक वाढ....!


🌟अशी माहिती पुर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली🌟

परभणी (दि.१८ जुन २०२४) :-  पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात रविवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने तुरळक अशी वाढ झाली असून जलाशयात आता २७.१४ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

               या येलदरी जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा तर ८०९.७७० दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे या जलाशयात ९३४.४४० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्या तूलनेत आज मंगळवार दि.१८ जुन २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत या जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत,२१९.८३४ जिवंत तर ३४४.५०४ एवढा एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. जलाशयातील पाणी पातळी ४५४.११० मीटर एवढी असून मागील २४ तासात या जलाशयात ०.२०७ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली. जलाशयात २७.१४ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या