🌟परभणी जिल्ह्यातील स्थलांतरित उसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू....!


🌟गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिंनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत🌟

परभणी (दि.14 जुन 2024) : समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींच्या शासकीय वसतीगृहासाठी संत भगवानबाबा  मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह, गंगाखेड, सोनपेठ व पालम या 3 तालुक्याच्या ठिकाणी येथे मुलांसाठी 3 व मुलींसाठी 3 अशी एकूण 6 शासकीय वसतीगृहामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिंनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.

त्यानुषंगाने गंगाखेड, सोनपेठ व पालम येथील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी-विद्यार्थीनींना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. सदर शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता 5 वी ते पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणारी ऊसतोड कामगारांच्या मुले-मुली/पाल्य प्रवेशास पात्र राहतील. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, अभ्यासाकरिता टेबल, खुर्ची, पुस्तके, वह्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी कपाट, कॉट, गादी, उशी, अंथरून पांघरून, बेडशीट, ब्लंकेट, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. 

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यास्तरावरील मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह गंगाखेड येथील अतिरिक्त गृहपाल अमृत.एम.मुंडे (मो.क्र.9697254444), पालम येथील रणजीत भराडे (मो.नं 9420885534) व सोनपेठ येथील व्ही.डी.परभणीकर (मो.नं.9421385052) किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा (02452-220595) दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गिता गुट्टे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या