🌟स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठातील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टडी चेअरसाठी आम्ही वचनबद्ध आहोत....!


🌟नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांचे प्रतिपादन🌟 


नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरु असलेल्या श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्राच्या स्टडी चेअरच्या इमारतीची तपासणी करण्यासाठी डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय. ए. एस. आणि प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड हे स्वतः विद्यापीठ येथे भेट दिली. विद्यापीठामध्ये वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी आणि अन्य पदाधिकार्यांसोबत एक विशेष बैठक पार पाडण्यात आली. डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्राच्या स्टडी चेअरच्या कामावर विशेष लक्ष देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी यांचे धन्यवाद व्यक्त केले आणि या कामात कोणत्याही प्रकारची काहीही मदत किंवा गरज वाटल्यास गुरुद्वारा बोर्ड त्यासाठी खुल्या मनाने तयार आहे.


माननीय व्ही. सी. डॉ. मनोहर चासकर जी यांनी आपल्या कार्यालयामध्ये डॉ. विजय सतबीर सिंघ आणि स. जसवंत सिंघ बॉबी यांचा स्वागत आणि सत्कार केला. व्ही. सी. साहेबांनी सांगितले कि लवकरात लवकर हि इमारत बनून तयार होईल आणि श्री गुरु गोबिंद सिंघ जी यांचे जीवन कार्य, शिकवणी आणि गुरु ग्रंथ साहिब जी यांचा मराठी भाषेऐवजी प्रादेशिक भाषांमध्येही भाषांतर करण्यात येईल. व्ही. सी. साहेबांनी आपल्या मदतीसाठी आणि कामाला पाठींबा देण्यासाठी डॉ. विजय सतबीर सिंघ यांचा धन्यवाद केला आणि सांगितले कि येणाऱ्या काळामध्ये आम्ही येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद ठेवण्याचा विचार करीत आहोत. जेणेकरून श्री गुरु गोबिंद सिंघ जी यांच्या प्रेरणादायी जीवन आणि विचारांचा लाभ मानवतेला प्राप्त होईल. यावेळी त्यांच्यासोबत अमरप्रीत सिंघ जी जज आणि आदरणीय वर्ग उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या