🌟परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 'एक रुपयात पीक विमा योजनेचा' लाभ घ्यावा.....!


🌟भाजपा अभियंता आघाड़ी जिल्हाध्यक्ष विजय कराड़ यांचे शेतकरी बांधवांना आवाहन🌟

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी 'एक रुपयात' विमा भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे भात, ज्वारी,बाजरी,नाचणी,मका,तूर,मूग,उडीद,सोयाबीन,भुईमूग,तीळ,कारळे,कापूस व कांदा या 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या www.pmfby.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून सिएससी केंद्रांमधून केवळ एक रुपया विमा हिस्सा म्हणून भरून आपला विमा भरता येईल.

सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने 15 जुलैच्या आत आपला पीकविमा भरून आपले पीक संरक्षित करुन घ्यावे असे आवाहन भाजपा अभियंता आघाड़ी जिल्हाध्यक्ष विजय कराड़ यानी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या