🌟पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील देशमुख पिंपरीत प्रेम विवाह केल्याच्या रागातून हत्या..!


🌟मनाविरुद्ध प्रेम विवाह केल्याचा राग अनावर झाल्याने सख्ख्या बापाने व भावाने केली २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या🌟

🌟घटनेतील आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात🌟

✍🏻शमीम पठाण (ताडकळस)

पुर्णा (दि.१० जुन २०२४) - पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील देशमुख पिंपरी येथील जन्मदात्यांनी स्वतःच्या मुलाचा प्रेम संबंधाचा राग मनात धरून खून केल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार दि.१० जुन २०२४ रोजी उघडकीस आली.

ताडकळस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी देशमुख येथील माधव अवकाळे यांना दोन मुलं होते त्यापैकी मोठा मुलगा गोविंद माधव अवकाळे वय २५ वर्ष यांनी गावातीलच तसेच आपल्याच जातीतील एका युवतीशी प्रेम संबंध ठेवून मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे जाऊन प्रेम विवाह केला त्यानंतर मयत गोविंद तसेच त्याची पत्नी दोघेही संसार थाटून पुण्यात राहू लागले तेव्हा त्याचे वडील माधव अवकाळे वय ५० वर्ष तसेच भाऊ व्यंकटेश अवकाळे वय २३ वर्षे यांनी आम्हाला पसंत नसलेल्या मुलीशी विवाह का केला याचा राग मनात धरून मयत गोविंदला प्रेमाने घरी बोलावले दि.०९ जून २०२३ रोजी रात्री अंदाजे १०.०० ते ११.०० वाजेच्या सुमारास गोविंद शेतात झोपण्यासाठी गेला असता रात्री ११.०० ते आज रविवार दि.१० जुन रोजी सकाळी ०६.०० वाजेच्या दरम्यान बाप लेकाने संगणमत करून गोविंद यास धारदार शस्त्राने डोक्यात गळ्यावर तसेच मनगटावर खांद्यावर वार करून खून केला असल्याची माहिती आज रविवारी सकाळी ०६.०० वाजता ताडकळस पोलीस यंत्रणेला मिळाली असता ताडकळस पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके,पो.उप.नि. गजानन काठेवाड,पो.उप.नि.शिवकांत नागरगोजे, बिट जमादार आप्पाराव वऱ्हाडे,अतुल टेहरे,संदीप साळवे यांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला आरोपी मयताच्या घरचेच असल्याने मयताची फिर्याद अप्पाराव वऱ्हाडे यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२,३४ भादवि. नुसार गुन्ह्याची नोंद ताडकळस पोलिस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे प्रभारी कपिल शेळके करीत आहेत तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या