🌟परभणी जिल्हा पोलिस दलातील १२ पोलिस अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त....!


🌟सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीबद्दल उद्या ३० जुन रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात निरोप समारंभ🌟 


परभणी (दि.२९ जुन २०२४) : परभणी जिल्हा पोलिस दलातील १२ पोलिस अधिकारी-कर्मचारी उद्या शनिवार दि.३० जुन २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांना उद्या शनिवार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने एका कार्यक्रमाद्वारे भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.

             जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व अंमदार व त्यांचे कुटूंबिय, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  जिल्हा पोलिस दलातून सेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हळ, पोलिस निरीक्षक दिलीप तिडके (जिल्हा विशेष शाखा), पोलिस उपनिरीक्षक शरद सावंत (एटीएस), पोलिस उपनिरीक्षक सर्वश्री मधुकर शंकर पवार (पोलिस मुख्यालय), संभाजी गुणाची पंचांगे (पोलिस मुख्यालय), अरुण दत्तात्रय पुरी (कोतवाली पोलिस ठाणे), दिगंबर साहेबराव देशमुख (पोलिस नियंत्रण कक्ष), सय्यद असदुल्ला शाह मीर इफ्तेखार अली (डायल 112), राधाजी रामराव शिंदे (पोलिस मुख्यालय), पंडीत बाबाराव चट्टे (पूर्णा), पोलिस हेड कॉन्स्टेबल  शिवाजी ममताजी देशमाने (पालम) व राधाजी सटवाजी खाडे (पोलिस मुख्यालय) हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या