🌟नांदेड शहरातील बाफना टी पॉइंट येथील खिचडी भज्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'कविता हॉटेलला' भिषण आग....!


🌟सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी नाही परंतु आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान🌟 

नांदेड ( दि.०८ जुन २०२४) - नांदेड जिल्ह्यासह आंतरजिल्ह्यातील 'खिचडी भजे' खाद्य शौकीनांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील बाफना टी पॉइंट परिसरातील प्रसिद्ध 'कविता हॉटेलला' आज शनिवार दि.०८ जुन २०२४ रोजी दुपारच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली या भीषण आगीत हॉटेल मधील जवळपास सर्व साहित्य जळून भस्म झाल्याचे समजते दरम्यान आगीत एकूण किती नुकसान झाले व आग लागण्याचे मुळ कारण काय ? या संदर्भाची अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नसून  'कविता हॉटेलला' लागलेली भिषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी हजर झाले यावेळी अग्निशमन दलाच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत प्रभावाने आग आटोक्यात आणली.

बाफना टी पॉइंट परिसरातील कविता हॉटेल ही पहिल्या मजल्यावर असून आज शनिवारी दुपारी हॉटेलमध्ये अचानक आग लागली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कविता हॉटेलमधील सर्व साहित्य आगीने खाक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्वरित अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाने अत्यंत त्वरित प्रभावाने आग आटोक्यात आणली आह. हॉटेल मालकाचे किती नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. तसेच आग कशी लागली याची ही माहिती प्राप्त झाली नाही......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या