🌟जालना जिल्ह्यातील कडवंची गावालगत समृध्दी महामार्गावर एर्टिका व स्विफ्ट डिझायर कारचा भिषण अपघात.....!


🌟या भीषण अपघातात ०७ जण जागीच ठार तर ०५ जण गंभीर जखमी : महामार्गावरचे बॅरिकेड मोडून स्विफ्ट गाडी खाली कोसळली🌟

जालना :-  समृद्धी महामार्गावरील भिषण अपघातांची मालिका थांबता थांबत नसून सदरील महामार्गावर झालेल्या भिषण अपघातांमध्ये आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून असाच एक भीषण अपघात जालना जिल्ह्यातील कडवंची गावालगत मध्यरात्री घडल्याचे समजते या भीषण अपघातात ०७ जण जागीच ठार तर ०५ जण गंभीर जखमी आहेत जालन्यातील कडवंची गावालगत नागपूरहून मुंबईकडे जाणारी एर्टिका गाडी व डिझेल भरून राँग साईडने येत असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडी कार एम.एच.४७ बिपीन ५४७८ समोरासमोर धडकल्याने एर्टिका गाडी एम.एच.१२ एमएफ १८५६ महामार्गावरचे बॅरिकेड मोडून खाली कोसळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही गाडी वर काढण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान या अपघातात ०५ जण गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमींपैकी तिघांची ओळख पटलेली आहे. अल्ताफ मन्सूरी, शकील मन्सूरी आणि राजेश अशी तीन जखमींची नाव आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या