🌟शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार श्री.रवींद्र वायकर यांच्या विजयाबाबत विरोधकांकडून केलेल्या अपप्रचार....!


🌟अपप्रचाराला 'मिड डे' सारखे प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्र देखील पडले बळी ?🌟 

शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार श्री.रवींद्र वायकर यांच्या विजयाबाबत विरोधकांकडून केलेल्या अपप्रचारला 'मिड डे' सारखे प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्र देखील बळी पडले याच अप्रचाराच्या प्रवाहात वाहवत जाऊन मिड डे  या वृत्तपत्राने  श्री.रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांकडे ईव्हीएम मशीन अनलॉक करणारा फोन होता ' अशा आशयाचे धादांत खोटे वृत्त प्रकाशित केले. कोणत्याही पद्धतीची तांत्रिक बाजूची पूर्तता न करता या आशयाचे वृत्त प्रकाशित करणे ही एकप्रकारे सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल करणेच आहे. संपूर्ण जग आपल्या भारतीय लोकशाही निवडणूक पद्धतीचे दाखले देत असतानाच अशा पद्धतीचे वृत्त निवडणूक प्रक्रियेवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून हे अत्यंत गैर आहे. 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत घोळ झाल्याची खोटी आवई जाणीवपूर्वक विरोधकांनी कशा पद्धतीने उठवली हे आपण सर्वजण जाणून आहोत. मात्र सत्य कधीच लपत नसते हे देखील तितकेच खरे आहे. सुदैवाने सत्य जाणून घेऊन आज  ' मिड डे ' या वृत्तपत्राला त्यांची चूक लक्षात आली आणि मतमोजणीत अशा पद्धतीचा कोणताही गैरप्रकार झालेला नाही याची कबुली आज स्वतः या वृत्तपत्राच्या वतीने देण्यात आली आहे. श्री.रवींद्रजी वायकर यांच्यावर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे त्यांचा निवडणुकीत विजय झाला आणि त्यांना खासदार म्हणून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र विरोधकांना हा पराभव जिव्हारी लागल्याने या विजयाबाबत विविध पद्धतीचे अपप्रचार सुरु झाले. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. यापुढे अशा पद्धतीची मोठी चूक कोणत्याही वृत्तसंस्थेकडून होणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो तर सर्व मतदारांनी देखील या अपप्रचाराला बळी पडू नये असेही शिवसेना (शिंदे) पक्षाने म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या