🌟भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भव्य ‘धम्म रॅली’ श्रामनेर संघाचा सहभाग : बुध्द वंदनेचा कार्यक्रम....!


🌟अतिशय शिस्तीमध्ये चालत श्रामनेर संघाद्वारे ‘बुद्धम् शरणम् गच्छामीचा' जय घोष करत ही रॅली निघाली🌟

परभणी (दि.08 जुन 2024) : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने  गौतम नगरातील श्रावस्ती बुध्द विहारात दहा दिवशी श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याअनुषंगाने शुक्रवार 7 जून रोजी गौतम नगर परिसरात श्रामनेर संघाची भव्य धम्म रॅली काढण्यात आली.

               अतिशय शिस्तीमध्ये चालत श्रामनेर संघाद्वारे ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ चा जय घोष करत ही रॅली निघाली. उपासिकांनी पंचशील ध्वज हातात घेत शुभ्र वस्त्र परिधान करून या रॅलीत सहभाग नोंदवला. रॅलीमध्ये जागोजागी श्रामनेर संघावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर श्रामनेर संघाचे स्वागत करण्यात आले. या रॅलीत जय भवानी महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ. संप्रीया राहुल पाटील, यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तथागत भगवान, बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यानंतर श्रामनेर संघाच्या वतीने उपासकांना त्रिशरण पंचशील देण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्यात आले.

              या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले, जिल्हा सरचिटणीस डि. आय. खेडकर, कोषाध्यक्ष विश्‍वनाथ झोडपे, साचिव एस. एस. साळवे, शिवाजीराव वाव्हळे, नागसेन हत्तीअंबीरे, बौध्दाचार्य अतुल वेराट, जी. आर. गायकवाड, रिपाईचे पंडित टोमके, डॉ. सुनील तुरुकमाने, उमेश शेळके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले तर आभार प्रा. अतुल वैराट यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रावस्ती महिला मंडळ तसेच यश क्रीडा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या