🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील झालेल्या पोस्टल मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण....!


🌟जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न🌟

परभणी (दि.०१ जुन २०२४) : परभणी लोकसभा मतदारसंघातील झालेल्या पोस्टल मतदानाचे मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी अधिकारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजित सभागृहामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

            या प्रशिक्षणास अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, निवासी उप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, पोस्टल मतदानाच्या नोडल अधिकारी संतोषी देवकुळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, अजिंक्य पवार या सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या