🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे बचतगट महिलांनी वृक्षारोपन करुन वृक्षसंगोपनाचा घेतला वसा...!


🌟वृक्षारोपन करुन पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजेच मानवी जीवन सुरक्षित राहील : मान्यवरांनी वृक्षारोपनाप्रसंगी व्यक्त केले मत🌟


फुलचंद भगत

वाशिम:-ऊमेद महाराष्टराज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानातर्फे विदर्भ कन्या बचत गट,जिजाऊ बचत गट तसेच वंदना बचत गटातील महिला व वसुंधरा टिमच्या सहकार्याने मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील सतीआई मंदीर परिसरात वृक्षारोपण केले.

            निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन वसुंधरा टिमच्या निता लांडे यांनी शेलुबाजार येथील वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी केले. वृक्ष लागवड ही एक व्‍यापक चळवळ झाली असून, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्‍मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्‍हावे, असे मत नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास मिशन संस्थेच्या जिल्हाध्यक्षा आशा अंबाडकर यांनी व्यक्त केले.सध्याची परिस्थीती बघता झाडे लावणे गरजेचे आहे.प्रत्येकाने वृक्ष लावण्‍याचे ऊदिष्ट पुर्ण करावे.हे ऊदिष्ट यशस्‍वी करण्‍यासाठी लोकसहभाग आवयश्‍क असल्‍याचे सांगुन,सध्या झपाट्याने झाडांची कत्तल केल्या जात असल्याने मानवी वस्तीसाठी झाडे आम्‍ही तोडत असुन, तोडलेल्‍या झाडांची उणीव भरून काढण्‍यासाठी वृक्ष लागवडीकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही बचत गटाच्या तेजस्वीनी काळे यांनी केले.या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी विदर्भ कन्या बचतगट,जिजाऊ बचतगट,वंदना बचत गटातील स्वेता घोडे,पार्वती गावंडे,ऊज्वला सदाशिव,प्रियंका सुडके,गौरी घोडे,मोनिका ऊजवणे,ऊषा ऊजवणे,इंगळे,चक्रनारायण,बारड,तेजस्विनी काळे,निता लांडे,आशा अंबाडकर यांची ऊपस्थीती होती......

प्रतिनीधी :-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या