🌟वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या....!


🌟युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट🌟

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथील तरुण पवन गजानन मोरे अंदाजे वय 22  वर्षे याने लोणी बु येथे गावा जवळच असलेल्या  नदी शेजारील गोंधनीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजता घडली सदर घटनेची माहिती मिळताच लोणी बुद्रुक चे पोलीस पाटील संजय गाडे यांनी रिसोड पोलीस स्टेशन ला सदर घटनेची  माहिती दिली असता रिसोड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल चव्हाण व इतर कर्मचाऱ्यासह घटनास्थळा भेट देत पंचनामा करून शव विच्छेदनसाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे रिसोड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मर्ग दाखल करन्यात आला पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, लोणी बुद्रुक चे पोलीस पाटील गाडे आणि लोणी बुद्रुक येथील गावकरी घटनास्थळी दाखल झाले असून पवन च्या अचानक जाण्याने लोणी बुद्रुक येथील मोरे परिवार तसेच संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या