🌟वाशिम येथील श्री बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी कॅडेटस ८ सुवर्णपदकाने सन्मानित....!


🌟अकोला येथील शिबीरात दैदीप्यमान कामगिरी : विविध खेळात व स्पर्धेत मिळविले प्राविण्य🌟


फुलचंद भगत

वाशिम - ११ महाराष्ट्र एनसीसी बटालीयन अकोलाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश बदोला यांच्या मार्गदर्शनात १५ ते २४ जून २०२४ दरम्यान अकोला येथील एसके कॅम्पस येथे पार पडलेल्या एनसीसी शिबीरात स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी कॅडेटसने विविध खेळ व स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कंपनीवाईज ८ सुवर्णपदक व १२ रजतपदक खेचून आणले. खेळाडूंच्या या धवल यशामुळे वाशिम जिल्हयाला सुवर्णझळाळी प्राप्त झाली आहे.

या शिबीरामध्ये ड्रील, फायरींग, रस्सीखेच, पथनाटय, चित्रकला, प्रश्नमंजुषा, वादविवाद, गायन, नृत्य आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अकोला, बुलडाणा व वाशिम येथील एकूण ४२२ एनसीसी कॅडेटसनी सहभाग घेतला. या स्पर्धेत श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एकूण ३२ एनसीसी कॅडेटसनी सहभाग घेत तब्बल ८ सुवर्णपदक पटकावले. यामध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक समर्थ विभुते, अंकित बोरचाटे, मयूर इंगोले, आयुष घोडके, जय व्यवहारे, तरुण रोकडे, प्रद्युमन पवार, सुनील भोयर तर बेस्ट कॅडेट रजतपदक प्रज्वल उखळे, आशिष रुद्राक्षे, अविनाश कोल्हे, कैवल्य रत्नपारखी, सिद्धीविनायक सुर्वे, कुणाल मुठाळ, अभिजित शिंदे, निनाद देशमुख, शिवम जाधव, प्रतीक सावके, दर्शन ओसवाल, युवराज वानखेडे आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानपदक देवून सन्मानित करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे व सर्व शिक्षकवृंद यांनी कौतूक केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या