🌟मला मंत्रिपद नको तर मला शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी काम करायचे आहे - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे


🌟खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले🌟

वडील महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते. स्वतः तिसऱ्यांदा निवडून आलेले खासदार आणि तेही तब्बल अडीच लाख मताधिक्याने. कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे आणि पाठीशी असलेला मोठा जनाधार यामुळे केंद्रातील मंत्रिपद हे सहज रित्या मिळत असतानाही  ' मला  मंत्रिपद नको तर मला शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी काम करायचे आहे. शिवसेना अधिक तळागाळात पोहचवायची आहे,' असे मत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. यातून त्यांची पक्षाप्रती असलेली समर्पण भावना दिसून येते. वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सच्चा शिवसैनिक हा कधीच सत्तेच्या आणि मंत्रिपदाच्या मोहात अडकत नाही. आज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या या भूमिकेतून बाळासाहेबांच्या या वाक्याची तंतोतंत प्रचिती येत आहे. त्यामुळे आज सर्व शिवसैनिकांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा नक्कीच अभिमान वाटत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या