🌟पुर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अर्धनग्न आंदोलन...!


🌟मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ एकवटला पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज🌟 

पुर्णा (दि.१३ जुन २०२४) :- मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे मागील सात दिवसांपासून अंतरवेली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले असून त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने निर्दयी सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवार दि.१३ जुन २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पुर्णा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार अर्धनग्न बोंबमारो आंदोलन करण्यात आले.

 यावेळी आंदोलकांनी 'जरांगे पाटलांचा बालेकिल्ला परभणी जिल्हा परभणी जिल्हा.....जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है....निष्क्रिय निर्दयी सरकारच्या नावान बो...बो....अशा जोरदार गगनभेदी घोषणा देत निषेध नोंदवला यावेळी तहसीलदार यांच्यासह पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांना निवेदन देखील देण्यात आले या अर्धनग्न बोंबमारो आंदोलनावेळी तालुक्यातील असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या