🌟परभणी जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु....!


🌟असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यसक संचालक यांनी केले आहे🌟

परभणी (दि.18 जुन 2024) : जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मुला-मुलींचे नाव नोंदणी करुन प्रवेश घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यसक संचालक यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण, परभणी कार्यालयांतर्गत इतर मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह, परभणी येथे दोन तसेच शासकीय वसतीगृहामध्ये विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण घेणा-या अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. तरी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील प्रथम वर्षात उच्च शिक्षण प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये रिक्त असणा-या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज इतर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, सितारामजी मुंदडा मराठवाडा तंत्रनिकेतन, खंडोबा बाजार, परभणी या वसतिगृहात वसतीगृह व्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजन भत्त्यात शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, इंटरनेट सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण असे असेल  इतर मागास वर्ग 51, विजाभज 33, विमाप्र 6, दिव्यांग 4, अनाथ 2 आणि आर्थिक मागास प्रवर्ग 4 असे एकूण 100 टक्के आहे. 

वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिका-याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अनाथ, दिव्यांग व आर्थिक मागास घटक वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिका-याने दिलेले वैध जात करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षमप्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांचे 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा कमी असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.

या वसतीगृहामध्ये प्रवेश हा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. ज्या पदवीका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश देय आहे. त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरीता प्रवेश देय राहील. विद्यार्थ्यांचे स्वतःचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत - शेड्युल्ड बँकेत खाते असणे आवश्यक आहे. विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था त्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. वसतीगृहासाठी जास्त अर्ज आल्यास गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. 

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी इतर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे वसतीगृह व्यवस्थापक श्री. पी. जी. उबारे (९२८४२६२६९३), ए. के. पठाण (९८६०९८५९८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या