🌟परभणी महानगर पालिकेच्या आयुक्त सौ.तृप्ती सांडभोर यांची परभणी महानगर पालिकेतच ‘प्रपत्र’ बढती.....!


🌟राज्याच्या नगरविकास विभागाने आज दि.२९ जुन रोजी परिपत्रक काढून १९ अधिकार्‍यांना पदोन्नती व पदस्थापना बहाल केली🌟

परभणी (दि.२९ जुन २०२९) :  परभणी महानगर पालिकेच्या आयुक्त सौ.तृप्ती सांडभोर यांची राज्याच्या नगरविकास विभागाने परभणीत महापालिकेतच आयुक्त या पदावर प्रपत्र बढती केली आहे.

              राज्यातील शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी-गट अ (निवड श्रेणी/उपायुक्त, गट-अ संवर्गातून स.आयुक्त) गट-अ संवर्गात तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेबाबत शुक्रवारी (दि.28) सायंकाळी एक परिपत्रक काढले. त्यातून 19 अधिकार्‍यांना पदोन्नती व पदस्थापना बहाल केली. यात परभणी महानगरपालिकेंतर्गत आयुक्त तथा प्रशासक सौ.तृप्ती सांडभोर यांना पदोन्नती नंतरही आयुक्त परभणी महानगरपालिका या कार्यरत पदावरच प्रपत्र बढती बहाल केली आहे. तर अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सह आयुक्त या पदावर नियुक्त केले आहे. या व्यतिरिक्त लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनाही लातूर महानगरपालिकेतच आयुक्त या कार्यरत पदावर प्रपत्र बढती बहाल केली आहे. तर जालना पालिकेत प्रशासक संतोष खांडेकर यांना आयुक्त तथा प्रशासक म्हणून जालना महापालिकेतच या कार्यरत पदावर प्रपत्र बढती बहाल केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या