🌟मंगरूळपीर तहसील कार्यालयांतर्गत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षण संपन्न....!


🌟पूर,विज,आग,भूकंप,सर्पदंश,रस्ते अपघात याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न🌟 

🌟राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांनी केले मार्गदर्शन🌟


फुलचंद भगत

वाशिम :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,वाशिम, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,नागपूर व तहसील कार्यालय, मंगरूळपिर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २४/०६/२०२४ रोजी स्थळ तहसील कार्यालय मंगरूळपिर येथे मा.बुवनेश्वरी एस.भाप्रसे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,वाशिम यांचे आदेशानुसार व मा.श्री विश्वनाथ वि.घुगे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांचे सूचनेनुसार तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन पूर, विज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश या विषयी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन मंगरूळपिर येथे करण्यात आले आहे सदर प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी उप विभागीय अधिकारी श्री दराडे  हे होते.


सदर प्रशिक्षणाला प्रमुख उपस्थिती मंगरूळपिर तहसीलदार श्रीमती शितल बंडगर, प्रमुख पाहुणे गट विकास अधिकारी श्री सोनवणे,प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार श्री बोंडे,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,नागपूरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक श्री जयस्वाल व सर्व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल टीम हे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन शाहू भगत, तहसीलदार शितल बंडगर ,ब्रिजेश कुमार यादव,Ndrf टीम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय मार्गदर्शन उप विभागीय अधिकारी मंगरूळपिर श्री दराडे यांनी केले.सदर प्रशिक्षणाला सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व विविध विभागाचे कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते प्रशिक्षण यशस्वीतेसाठी श्री देवेंद्र कांबळे, कोतवाल व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

१) मोठ्या व्यक्तीला व लहान मुलांना CPR कसा देणे.

२) पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना कसे सुरक्षित स्थळी पोहचायचे. प्राण कसे वाचवता येईल.

३) सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसे करावे. विषारी, निम विषारी, बिन विषारी साप कसा ओळखावा. लोकांचे प्राण कसे वाचवावे. सापाचे प्रकार किती आहे.

४) रस्ते अपघात झाल्यास लोकांचे प्राण कसे वाचवावे. प्रथमोचार कसे करावे.

५) अग्निशमन यंत्र कसे हाताळावे. आग लागल्यास ती कशी विझवावी. घरगुती गॅस कसा हाताळावा.

६) विजे पासून नागरिकांनी स्वतःचे प्राण कसे वाचवावे.

याबाबत विस्तृत मार्गदर्शन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या