🌟छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर आयटीआय येथे गुरुवारी.....!


🌟 शिबिरात सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास आडे यांनी केले🌟


परभणी (दि.18 जुन 2024) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य विकास आडे यांनी कळविले आहे. 

या करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी नंतर काय भविष्यातील शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी, कौशल्य शिक्षणाचे महत्त्व, अद्यायवत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करणे, व्यक्तिमत्त्व विकास व बायोडाटा तयार करणे इत्यादी  विविध विषयावर तज्ज्ञा मार्फत मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या समुपदेशन मेळाव्यामध्ये हजर राहून लाभ  घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास आडे यांनी केले आहे..... 

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या