🌟परभणी येथील एकनाथ नगरातील युवराज कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा लॅपटॉप भेट देऊन सत्कार...!


🌟यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा.विष्णू नवपुते हे उपस्थित होते🌟

परभणी (दि.१२ जुन २०२४) : परभणी शहरातील एकनाथ नगर येथील युवराज कोचिंग क्लासेसच्या वतीने सन २०२३/२४ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लॅपटॉप भेट देवून जंगी सत्कार करण्यात आला.

                   छत्रपती संभाजी महाराज एस.एस.सी. स्कॉलरशिपच्या माध्यमातून जून २०१९ पासून वर्ग दहावीमध्ये ९५ टक्केच्या वर गुण प्राप्त करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना या क्लासेसच्या वतीने दरवर्षी रुपये ५० हजार किमतीचा लॅपटॉप व श्रीमद् भागवत कथा देऊन गौरविण्यात येते. हा उपक्रम अविरत सुरू ठेवला असून याही वर्षी देखील आज बुधवार दि.१२ जून रोजी ‘गौरव गुणवंताचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. विष्णू नवपुते हे होते तर अध्यक्षस्थानी प्रा. रवी देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच प्रा. मारुती हुलसुरे, प्रा. संभाजी सवंडकर, प्रा. विठ्ठल खल्लाळ, प्रा. गोपाळ नगरसाळे, प्रा. श्रीकृष्ण वैरागर, विश्‍वनाथ सावंत, दीप्ती देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्लासेसचे संस्थापक युवराज देशमुख यांनी क्लासेसच्या वतीने सुरू केलेली परंपरा यापुढेही सुरू ठेवू, अशी ग्वाही दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या