🌟परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजीत केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ....!


🌟बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.म.शं.शिवणकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आले आयोजन🌟

परभणी (दि.01 जुन 2024) : परभणी येथील बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.म.शं.शिवणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजीत केलेल्या  खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार दि.01 जुन 2024 सकाळी 11.00 वाजता बाल मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार झरकर आणि बाल खेळाडू यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

            या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी म. शं. शिवणकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त  शिक्षकांचे प्रतिनिधी आडणे, अचिनतलवार, लोखंडे,  लोनसने, पांढरे  यांच्यासह  विद्यार्थी प्रतिनिधी उदय बायस, अनिरुद्ध शहाणे, अजय अनिल कुलकर्णी (सत्र न्यायाधीश मुंबई ) यांची उपस्थिती होती.

           येथील पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयामध्ये 1 आणि 2 रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. एकूण 50 हजार रुपये रकमेची 47 रोख पारितोषिके आणि 40 स्मृतीचिन्ह या स्पर्धेच्या विजेत्यांना वितरित केली जाणार आहेत. स्पर्धेमध्ये परभणी, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, मानवत, गंगाखेड, सेलू इत्यादी अनेक शहरांमधून एकूण 160 खेळाडूंनी सहभाग नोंदविलेला आहे.  या स्पर्धेचे प्रायोजकत्व बा. वि. म. शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  यांनी स्वीकारलेले आहे.

             स्पर्धा संचालक म्हणून संभाजी बील्पे आणि सहसंचालक दीपक राऊत हे काम पाहत आहे. संघटनेचे पदाधिकारी अनिल सेलगावकर, डॉ. अनिल दिवाण,  स्वप्निल कांसूरकर,  आनंद देशमुख, धनराज कांकरिया आणि संभाजी बील्पे हे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या