🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांकडून कर्ज प्रस्तावासाठी अर्ज आमंत्रित.....!


🌟माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले🌟

परभणी (दि.06 जुन 2024) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी राज्य शासनातर्फे अर्थसहाय्य करण्यात येते. उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाखापर्यंत कर्जमर्यादा आहे. सदर योजनेअंतर्गत पुरुषांसाठी 15 ते 25% पर्यंत व महिलांसाठी 25 ते 35 टक्के पर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. सन 2024-25 साठी जिल्हा उद्योग केंद्रास 1200 कर्जप्रस्तावांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्ह्यातील गरजू व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे. 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या