🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातील पुर्णा येथील रेल्वे डिझेल डेपोतील घोटाळ्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव लक्ष देणार काय ?


🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याचा तपास सिबीआय/ईडीकडे देण्याची होतेय मागणी🌟

🌟रेल्वे डिझेल डेपोतील कोट्यावधी रुपयांच्या डिझेल घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेत उपस्थित झाल्यानंतर देखील तपास गुलदस्त्यात ?


✍🏻विशेष वृत्त :- चौधरी दिनेश (रणजित)

नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा रेल्वे डिझेल डेपोत मागील अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा डिझेल घोटाळा होत असल्याची जोरदार चर्चा मागील अनेक वर्षांपासून काही रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांतून ऐकावयास मिळत होती परंतु या डिझेल घोटाळ्यात स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात असल्याने सदरील रेल्वे डिझेल घोटाळ्याची मालिका नियोजनबद्ध पद्धतीने चालविली जात होती परंतु मागील पाच महिन्यांपूर्वी दि.२९ जानेवारी २०२४ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठना पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगनापूर फाटा परिसरात परभणी जिल्हा स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत ५ हजार ५०० लिटर डिझेलसह डिझेल टँकर ताब्यात घेतल्याने पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असला तरी सदरील डिझेल घोटाळ्याला दि.२९ जानेवारी २०२४ या एकदिवसीय डिझेल चोरी प्रकरणा पुरतं मर्यादित ठेवून व त्याच पद्धतीने तपासाच्या नावावर कागद काळे करीत मागील जवळपास दहा/बारा वर्षांपासून होणाऱ्या रेल्वे डिझेल घोटाळ्यातील घोटाळेबाजांना वाचविण्याचा गंभीर प्रकार होत असल्याचे समोर येत आहे.


पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोत कार्यरत डिझेल घोटाळेबाज मुख्य आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड,आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर,ओएस कांचन कुमार हे अधिकारी/कर्मचारी जाणीवपूर्वक डिझेल टँकर खाली करीत असतांना डिझेल आवक/जावक दर्शवण्यासाठी लावले गेलेल्या मिटरसह (Flow Meter) सिसीटीव्ही कॅमेरे देखील पुर्णपणे बंद करुन सोईस्कररित्या डिझेल घोटाळ्याची मालिका चालवत असतांना दक्षिण मध्य रेल्वे नांदेड प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत होते काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून सदरील डिझेल घोटाळा प्रकरण दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेत गाजल्यानंतर देखील या प्रकरणात 'पुढे पाठ मागे सपाट' या निर्लज्जनितीचा अवलंब करीत या कोट्यावधी रुपयांच्या डिझेल घोटाळ्यावर पांघरूण घालण्यात एखाद्या मंत्र्या संत्र्याचा हात तर नाही ना ? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत असून रेल्वे मंत्रालय सचिवांनी दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभेत खासदार संजय जाधव यांनी पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांना तीस दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले खरे परंतु संबंधितांनी नेमका काय चौकशी अहवाल सादर केला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे निदर्शनास येत असून आता नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पदाचा पदभार अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवल्याने नुतन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याचा तपास सिबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालयाकडे सोपवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या