🌟विज पडुन मृत्यु झालेल्या मुलीच्या आईला शासनाकडुन आर्थिक मदतीचा हात...!


🌟आमदार लखन मलिक व तहसिलदार शितल बंडगर यांच्या प्रमुख उपस्थीतीत चार लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द🌟


फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातल्या जांब येथील शाळकरी मुलीचा मागील हप्त्यात दुपारच्या सुमारास विज पडुन मृत्यु झाला होता.नैसर्गीक आपत्ती कक्षामार्फत शासन निर्णयानुसार मृत्यु पावलेल्या मुलीच्या आईला दि.२२ जुन रोजी चार लाख रुपये मदतीचा चेक आमदार लखन मलिक आणी तहसिलदार शितल बंडगर यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत आणी हस्ते देण्यात आला.

        नैसर्गीक आपत्तीमुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना शासनाची त्वरीत मदत व्हावी यासाठी आमदार लखन मलिक नेहमी तत्पर असतात.मंगरुळपीर तालुक्यातील जांब गावची शाळकरी मुलगी अंगावर विज पडल्याने मागील हप्ती मृत्युमुखी पडली होती.दि.२२ जुन रोजी नैसर्गीक आपत्तीच्या शासन निर्णयानुसार त्या मुलीची आई श्रीमती नंदा दिनेश कांबळे यांना चार लाख रुपयाचा धनादेश आमदार लखन मलिक यांच्या हस्ते तर तहसिलदार शितल बंडगर यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत सुपुर्द करण्यात आला.यावेळी योगेश देशपांडे,निलेश जयस्वाल,दिलीपभैया ठाकुर,नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे देवेंद्र कांबळे,लिपिक नरेंद्र इंगोले,गोपाल लुंगे,गोपाल भुसारे,विशाल ठाकुर,जांब गावचे पोलीस पाटील,गोपाल देवळे आणी गावकर्‍यांची ऊपस्थीती होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या