🌟वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचीधाडसी कारवाई : ग्राम मोहगव्हान येथील गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड....!


🌟स्थागुशाच्या कारवाईत 05 लाख 09500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟


 
फुलचंद भगत

वाशिम :- पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम मोहगव्हान येथील धरणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रोहिबिशन रेड केली असता सदर रेड मध्ये एकूण 100 लिटर च्या 10 टाक्या, 200 लिटरच्या 12 टाक्या,15 लिटरच्या 73 लोखंडी डब्बे,15 लिटरच्या 20 प्लास्टिक कॅन असा एकूण 4795 लिटर मोहा माच सडवा व 150 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकुन 5,09,500/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्यावररून आरोपी नामे मोहम्मद पिरू नंदावाले, रा. मोहगव्हान, ता. जि.  वाशिम व इतर 08 ते 10 इसमा विरोधात पोलीस स्टेशन अनसिंग येथे कलम 65 (ई) (क) (फ) (ड) महाराष्ट्र दारू बंदी कायदा अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रमाकांत खंदारे, गजानन अवगळे, गजानन झगरे, प्रशांत राजगुरू, अमोल इंगोले, प्रवीण शिरसाट, गजानन गोटे, महेश वानखेडे, संदीप डाखोरे सुषमा तोडकर व कविता गायकवाड यांनी पार पाडली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या