🌟'दामिनी' अँप वापरण्याचे नागरिकांना आवाहन....!


🌟परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आवाहन🌟 

परभणी (दि.०५ जुन २०२४) : मान्सून कालावधीत विशेषतः माहे मे, जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवित हानी होत असते. ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांनी "दामिनी " अँप तयार केले असून ते Google Play Store वर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, नागरिक, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायतींनी ते डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे. तसेच ते GPS लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी त्याची स्थिती दर्शविते. आपल्या सभोवतील परिसरात वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतच्या सूचना अँपद्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी हे दामिनी अँप Play Store डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या