🌟पुर्णा तालुका सकल मराठा समाजाची बैठक संपन्न.....!


🌟अंतरवाली येथे हजारो मराठा समाज बांधव जाणार🌟 

पुर्णा (दि.०१ जुन २०२४) - पुर्णा शहरातील नवा मोंढा परिसरातील हनुमान मंदिरात आज शनिवार दि.०१ जुन २०२४ रोजी पूर्णा तालुक्यातील सकल  मराठा समाज बांधवाची  तालुक्याची बैठक पार पडली. 

शासनाने सगे सोयऱ्या बाबत निर्णयाची अंमलबजावणी तसेच कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आदि मागण्यासाठी मनोज जरांगे_पाटील चार जून मंगळवारपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा  बेमुदत उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील हजारो समाज बांधव जाणार असा निर्धार तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी या बैठकीत केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या