🌟वाशिम येथील विद्याभारती शाळेतून नम्रता काळे हिने फटकाविला 90 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक....!


🌟यावर्षी विद्याभारती शाळेचा निकाल लागला शंभर टक्के🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- स्थानिक विद्याभारती शाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी नम्रता सुनील काळे हिने 90 टक्के गुण घेऊन शाळेतून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे यावर्षी विद्याभारती शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून निकालाची परंपरा शाळेने यावर्षीही कायम ठेवली आहे.

या शाळेची दहावीची विद्यार्थिनी नम्रता सुनील काळे हिने  जिद्द व चिकाटीने परिश्रम घेऊन 90 टक्के गुण मिळविले आहेत स्थानिक सिविल लाईन येथील व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील काळे  यांची नम्रता ही मुलगी असून बालपणापासूनच ती अभ्यासात हुशार आहे या यशासाठी तिला आई, वडील, शाळेचे मुख्याध्यापक नितेश मिटकरी तसेच वर्गशिक्षक सुमित मिटकरी आणि विजय गोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे नम्रता ने सांगितले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या