🌟 टिम इंडियाची सुपर 8 मध्ये जबरदस्त सुरुवात : अफगाणिस्तावर 47 धावांनी मात......!


🌟अफगाणिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले🌟

✍️मोहन चौकेकर

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 47 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचं 20 ओव्हरमध्ये 134 धावावंर पॅकअप झालं. टीम इंडियाच्या फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांची आपली भूमिका चोखपणे पार पाडली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी सूर्यकुमार यादव याने 53 आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या याने 32 धावांची खेळी केली.

* अफगाणिस्तानची बॅटिंग :-

अफगाणिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे अफगाणिस्तानला सामन्यात कमबॅक करताच आलं नाही. अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझई याने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त एकालाही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 20 पार मजल मारु दिली नाही. अफगाणिस्तानकडून रहमानउल्लाह गुरुबाज 11, हझरतुल्लाह झझाई 2, इब्राहीम झद्रान 8, गुलाबदीन नईब 17, नजीबुल्लाह झद्रान 19, मोहम्मद नबी 14, राशिद खान 2 आणि नूर अहमदने 12 धावा केल्या. नवीन उल हक याला भोपळाही फोडता आला नाही. तर फझलहक फारुकी 4 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून बुमराह आणि अर्शदीप या दोघांना इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली. कुलदीप यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

* सामन्यातील पहिला डाव :-

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. सूर्याने 28 बॉलमध्ये 5 चौकार आणि 3 सिक्स ठोकले. तर हार्दिक पंड्या याने 32 धावांचं योगदान दिलं. इतरांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोही 24, ऋषभ पंत 20 धावांवर बाद झाले. रोहित शर्माने 8 आणि रवींद्र जडेजा 7 धावा केल्या. शिवम दुबेने पुन्हा निराशा केली. शिवम 10 धावा करुन माघारी परतला. अक्षर पटेलने 12 धावा जोडल्या. तर अर्शदीप सिंहने 2 नाबाद धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि राशिद खान या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक याच्या खात्यात 1 विकेट गेली.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या