🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे 5 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न...!


🌟यावेळी वृक्षरोपण या मोहिमेत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला🌟 


पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .5 जून रोजी दिवस भर शैक्षणिक, सांस्कृतीक, पर्यावरण विषयक,नागरिक उपयोगी कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन गावकरी व जयंती समिती च्या वतीने करण्यात आले होते 5 जून 2024 रोजी सकाळी 7 ते 8 -स्वच्छता अभियान राबविण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज आश्रम  शाळा या परिसरात स्वच्छता राबविण्यात आली.तसेच सकाळी 8 ते 9 -वृक्षारोपण करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळा परिसरात चिंच, जांब, सीताफळाची झाडें लावण्यात आली, वृक्षरोपण या मोहिमेत गावातील भरपूर नागरिकांनी सहभाग घेतला होता.


त्यानंतर सकाळी 9:30 ते दुपारी 11 पर्यंत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत च्या मुला आणि मुलींची निबंध स्पर्धा घेण्यात आली, या निबंध स्पर्धेचा विषय होता 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन परिचय', ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती एक गट होता पाचवी ते सातवी आणि दुसरा गट होता आठवी ते दहावी, या परीक्षेत 120vविद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, खूप छान प्रकारे अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या स्पर्धेचे आयोजन देखील छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळा या ठिकाणी केले होते तसेच याच शाळेमध्ये समता फॉउंडेशन मुंबई आणि अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाच्या वतीने मोफत मध्ये पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आणि ई श्रम कार्ड काढून देण्यासाठी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते या कॅम्प मध्ये 334 नागरिकांनी सहभाग घेतला आपली आपली आवश्यक ती सर्व कार्ड गावातील नागरिकांनी मोफत मध्ये काढून घेतली, या कॅम्पचे आयोजन समता फॉउंडेशन मुंबई तर्फे करण्यात आले होते, समता  फॉउंडेशन नी सकाळी 9पासून ते सायंकाळी 6 पर्यंत गावातील लोकांची पॅन कार्ड, ई श्रम कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढून दिले, त्यांना मदत जयंती मंडळाच्या सर्व सदस्यांनी केली. दुपारी तीन वाजता गावातून पुण्यश्लोक  अहिल्यादेवी  होळकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीसाठी गावातील खुप मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग, जेष्ठ नागरिक उपस्थित होते या मिरवणूकीने गावातील सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेदले, तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसला. नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिरवणूक चालली , मिरवणूक झाल्या नंतर जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


       त्या नंतर रात्री रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता पण काही कारणास्तव हा कार्यक्रम आज सकाळी आठ वाजता आयोजित केला, आज सकाळी भव्य असे ह भ प विकास महाराज देवडे यांचे कीर्तन पार पडले, या कीर्तणासाठी गावातील महिला आणि पुरुष वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आला होता.11 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर गावात मागच्या एका वर्षांपासून ज्यांनी व्यसन सोडले आहे, त्यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अश्या प्रकारे दोन दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यात खूप असे शैक्षणिक, सामाजिक, नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबविण्यात आले. गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, युवा वर्ग, महिला वर्ग आणि जेष्ठ नागरिक, पुरुष  सहभागी झाले होते, धनगर टाकळी येथे झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक  जयंती आगळी वेगळी साजरी झाली. या जयंती निमित्त आयोजित उपक्रमाची चर्चा ही पूर्णा तालुक्यात होतं आहे.

हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न होण्यासाठी गावातील सर्वांनी मेहनत घेतली, सर्व जाती धर्माची नागरिक या जयंती मध्ये सहभागी झाले होते, गावातील युवा वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, जेष्ठ नागरिक, जयंती मंडळाचे सदस्य, समता फॉउंडेशन मुंबई, सर्व गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या