🌟नांदेड येथे सहावे धर्मगुरू श्री गुरु हरगोविंद साहिब यांची 429 वी जयंती नगरकीर्तन व विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी....!


🌟श्री गुरु हरगोविंद साहेब यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन हजुरी क्रांती संघटना व हजूरी साध संगतच्यावतीने करण्यात आले🌟


नांदेड (दि.२२ जुन २०२४) - सिख धर्मियांचे सहावे धर्मगुरू श्री गुरु हरगोविंद साहेब यांची 429 जयंती 22 जून 2024 रोजी साजरी करण्यात येते. त्यानिमित्त 16 ते 22 जून दरम्यान विविध उपक्रमांसह भव्य नगरकीर्तन व लंगर प्रसादाने सांगता करण्यात आली सिख धर्मियांची दक्षिणकाशी मानल्या जात असलेल्या नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे शीख धर्मीयांचे सहावे धर्मगुरू श्री गुरु हरगोविंद साहेब यांची 429 वी जयंती अबचलनगर येथील फत्तेसिंहजी मंगल कार्यालय येथे 16 ते 22 जून दरम्यान मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


     श्री गुरु हरगोविंद साहेब यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन हजुरी क्रांती संघटना व हजूरी साध संगतच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, सहाय्यक जत्थेदार संत रामसिंघजी, मीत जत्थेदार बाबा ज्योतिंदरसिंघजी, हेड ग्रंथी बाबा कश्मीरसिंघजी, मित ग्रंथी गुरमीतसिंघजी पुजारी, कार सेवा लंगर साहेबचे बाबा बलविंदरसिंघजी,  स. सरबजीतसिंघ निर्मले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती श्री गुरु हरगोविंद साहेब यांच्या जयंतीनिमित्त 16 ते 22 दरम्यान आद गुरुग्रंथ साहेब, श्री दशम गुरुसाहेब, श्री सरबलोह ग्रंथ साहिब यांचे सप्ताह पाठ पठण करण्यात आले त्याचप्रमाणे दररोज सुखमणी साहेब पठण, नाम सिमरन, श्री गुरु हरगोविंदसिंघ यांची जीवनकथा देखील पठण करण्यात आले त्यादरम्यान दिनांक 17 ते 18 जून रोजी आर्चरी (धनुष्यबाण) स्पर्धा व 19 ते 20 जून रोजी लाठीकाठी ( गतका ) स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. श्री हरगोविंदसाहेब यांच्या जयंती समारोप दिनांक 22 जून रोजी भव्य नगरकीर्तनाने सांगता करण्यात आली. नगर कीर्तन अबचलनगर येथून निघून बडपुरा - शहीदपुरा मार्गे सचखंड गुरुद्वारा येथे सर्व श्रद्धालुंना लंगर प्रसादाने सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान हजुरी क्रांती संघटना व हजुरी साध संगतसह हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या