🌟नांदेड येथे श्री गुरु हरगोविंद साहिबजी महाराज यांच्या 429 व्या जंयती निमित्त विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.....!

🌟शहरातील अबचल नगर कॉलनीतील बाबा फतेह सिंघजी मंगल कार्यालयात दि.१६ ते २२ जुन पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम🌟 

                                                                                      नांदेड :- सिख धर्माच सहावे धर्मगुरू श्री हरगोविंद साहिब जी यांच्या 429 व्या जयंती निमित्त दिनांक 16/06/2024 ते 22/06/2024 पर्यंत विविध धामीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री गुरू ग्रंथ साहिबजी,श्री दसम ग्रंथ साहिब जी,श्री सरबलोह ग्रंथ साहिब जी श्री चौपई साहिब चे पाठ होणार आहे. सामारोप नगरकिर्तानाने होणार असल्याचे माहिती हजुरी साघ सगत व हजुरी क्रांती सघटनांचे प्रमुख स. मनप्रीत सिंघ कुंजीवाले यांनी दिले आहे

                     गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाब कुलवंत सिंघ जी, समुह पंजप्यारे साहिब यांच्या आर्शिवादाने व बाबा नरिदंर सिंघ जी व बाबा बलविंदर सिंघ जो लंगर साहिब (कार संवा वाले) व माता साहिव देवाजी चे जत्थेदार बाबा तेजासिंध यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरू हरगोविंद साहिव जी यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सहावं गुरु हरगोविंद साहिब जी यांची जयंती 22/06/2024 साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने फतेह सिंघजी मंगल कार्यालय अबचर नगर कॉलनी येथे सात दिवस दर रोज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

                     या मध्ये दुपारी 3.30 ते 5.00 च्या दरम्यान सुखमनी साहिब पाठ व सायंकाळी 8.00 ते 9.00 वाजता दरम्यान श्री गुरू हरगोविंद साहिब यांच्या जिवन कथा, कथाकार, ज्ञानी सरबजीत सिंघजी निर्मले व ज्ञानी नाहर सिंघजी हे सादर करणार आहेत दर रोज कथाच्या नंतर सायंकाळी 9.00 ते 9.30 पर्यंत नाम स्मिरण चे पाठ होणार व नंतर लंगन प्रसाद च्या आयोजन केले आहे. दिनांक 17/06/2024 व 18/06/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आर्चरी (धनुष्यबान) प्रतियोगिता व दिनांक 19/06/2024 ते 20/06/2024 पर्यंत खुला गतका प्रतियोगिता चे आयोजन होणार आहेत व नंतर दिनांक 22/06/2024 रोजी सप्ताह पाठच्या समाप्ती होईल या कार्यक्रमांना सर्व साध संगतने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम व लंगर प्रसादाचा लाभ घेऊन महाराजांचे आशिवार्द प्राप्त करावेत. असे आव्हान हजुरी क्रांती संघटनेच्या वतीने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या