🌟शेतकरी उत्पादक संघ,कंपनीकडून 31 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित.....!

🌟गोदाम बांधकाम तसेच बीज प्रक्रिया संचासाठी भौतिक लक्षांक प्राप्त🌟

परभणी : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान २०२४-२५ अंतर्गत जिल्हास्तरावर २५० मेट्रीक टन गोदाम बांधकाम या बाबीचे अनुक्रमे ४ व १ (एकुण ५) भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये यापैकी जे कमी असेल अशा प्रकल्पांसाठी शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र संघ तसेच कंपन्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे.

तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (FPO/FPC) साठी बीजप्रक्रिया संचासाठी १ भौतिक लक्षांक प्राप्त असून बीजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्रसामुग्री व बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा रु १०.०० लाख या पैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. यासाठी दिनांक ३१ जुलैपर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत बँक कर्जाशी निगडीत असल्यामुळे अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने सदर प्रकल्प मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्जदारास अनुदान देण्यात येईल.

यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिका-यांकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाईन्स व स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह गोदाम बांधकाम व बीजप्रक्रिया संच प्रस्ताव शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करण्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.......


 *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या