🌟परभणी औद्योगिक प्रशिक्षिण संस्थेत 30 जूनपर्यंत प्रवेश सुरु.....!


🌟30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.05 जुन 2024) : जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 10 वी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी सन 2024-25 मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रवेशासाठी http://admission.dvet.gov.in या अधिकृत पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच 1 जुलैपर्यंत अर्जाची निश्चिती संबधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करावी. तसेच परभणी जिल्ह्यातील आयटीआय व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरु असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. अधिक माहितीसाठी सबंधित प्राचार्य आय.टी.आय यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी परभणी यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील शासकीय आय.टी.आय मध्ये 1652 व खासगी संस्थेमध्ये 1024  प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत. परभणी येथे बेसिक कॉस्मेटॉलॉजी, सुतारकाम, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक ऑटो बांडो रिपेअर, प्लॉसिटक प्रोफेसिंग ऑपरेटर, पंप ऑपरेटर, सिंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफी, संधाता, अरेखक यांत्रिकी, आरेखक स्थापत्य, वीजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, जोडारी यंत्र, कारागीर यंत्र, कारागीर घर्षक, रेफ्रीजरेशन अँण्ड एसी, यांत्रिकी मोटार गाडी पेंटर, जनरल सर्वेअर, कातारी, तारतंत्री, मानवत येथे वीजतंत्री, तारतंत्री, जोडारी, यंत्र कारागीर, यांत्रिक मोटार गाडी, मेकॅनिक टॅक्टर, संधाताचे प्रशिक्षण देण्यात येते.

गंगाखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री, वेल्डर, शिट मेटल वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, जोडारी, ड्रेसमेकींग, जिंतूर येथे फीटर, नळकारागीर, वेल्डर, ड्रेसमेकींग, पालम येथे शिवण व कर्तन, पुर्णा येथे नळकारागीर, ड्रेस मेकींग, पाथरी येथे कोपा, ड्रेस मेकींग, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, सेलू येथे वेल्डर, ड्रेस मेकींग आणि सोनपेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री, फीटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामींग असिस्टंट (कोपा)चे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे जास्तीत -जास्त युवक -युवतींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.......

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या