🌟लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा तर महायुतीला 17 जागा......!


🌟सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी🌟

🌟रावसाहेब दानवे,पंकजा मुंडे,नवनीत राणा,सुजय विखे पाटील, भारती पवार,कपिल पाटील आदी दिग्गज नेते पराभुत🌟       

 ✍️  मोहन चौकेकर                                   

(काँग्रेस 13,शिवसेना ठाकरे गट 9,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 8,भाजपा 9,शिवसेना शिंदे गट 7,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 जागेवर विजयी)


देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गेल्या 10 वर्षांपासून अविरतपणे सत्तेत असणाऱ्या भाजपप्रणित एनडी सरकारला या निकालातून हादरे बसले आहेत. महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. आतापर्यंत मतमोजणीतून आलेल्या निकालानुसार अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला .विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रात भाजपची मोठी हानी झालेली बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघावर कोण- जिंकले व कोण खासदार म्हणून निवडून आले ते जाणून घ्या.

* महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी :- 

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट

2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट (पराभव) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट (विजयी)

3) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे गट ( अवघ्या 48 मतांनी पराभव) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट – (विजयी)

4) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (पराभव) विरुद्ध , रविकांत तुपकर अपक्ष (पराभुत ) विरुद्ध  प्रतापराव जाधव – शिंदे गट (विजयी)

5) ठाणे – राजन विचारे – ठाकरे (पराभव) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट (विजयी)

6) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट

7) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट

8) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट विरुद्ध इम्तियाज जलील – एमआयएम विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट (विजयी)

9) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट – निकाल येणे बाकी आहे

10) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट

11) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट (विजयी)

12) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट

13) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट

14) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट (विजयी), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी

15) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (विजयी), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी

16) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (विजयी) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस

17) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस (विजयी) विरुद्ध उज्वल निकम – भाजप

18) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप (पराभव) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस (विजयी)

19) धुळे – सुभाष भामरे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस (विजयी)

20) जालना – रावसाहेब दानवे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस (विजयी)

21) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस (विजयी )सुधाकर श्रृंगारे – भाजप –( पराभव)

22) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप (पराभव) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस (विजयी)

23) अकोला – अनुप धोत्रे – भाजप विजयी अभय पाटील – काँग्रेस (पराभव)

24) अमरावती – नवनीत राणा – भाजप (पराभव) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस (विजयी)

25) नागपूर – नितीन गडकरी – भाजप (विजयी) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस

26) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप (पराभुत )विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस ( विजयी )

27) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (विजयी)

28) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (विजयी) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप

29) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप (विजयी) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस

30) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस (विजयी) विरुद्ध राम सातपुते – भाजप

31) भिवंडी – कपिल पाटील – भाजप (पराभव) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट (विजयी)

32) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार (विजयी) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप

33) रावेर – रक्षा खडसे – भाजप (विजयी) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट

34) बीड –बजरंग सोनवणे शरद पवार गट ( विजयी ) पंकजा मुंडे – भाजप पराभूत 

35) वर्धा – रामदास तडस – भाजप विरुद्ध अमर काळे – पवार गट (विजयी)

36) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट (विजयी) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप

37) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट (पराभव) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप (विजयी)

38) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट (विजयी), सुजय विखे पाटील – भाजप पराभूत 

39) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप पराभूत 

40) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप (विजयी) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे पराभूत 

41) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप (विजयी) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट

42) जळगाव – स्मिता वाघ – भाजप (विजयी) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट पराभूत 

43) सांगली – संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (विजयी)

44) रायगड – अनंत गीते – ठाकरे (पराभव) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी (विजयी)

45) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे (विजयी) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी

46) परभणी – संजय जाधव – ठाकरे (विजयी) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रीय समाज पक्ष (महायुती) पराभूत 

47) रामटेक – राजू पारवे – शिवसेना विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस (विजयी)

48) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (विजयी), संजय मंडलिक – शिवसेना (पराभुत) 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या