🌟परभणी जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत 295 उमेदवार ठरले पात्र....!


🌟तर भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी कागदपत्र तपासणीत 59 उमेदवार ठरले अपात्र🌟

परभणी (दि.20 जुन 2024) : परभणी जिल्हा पोलिस दलांतर्गत पोलिस शिपाई व चालक या दोन पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत आज गुरुवार दि.20 जुन रोजी दुसर्‍या दिवशी 295 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले तर 59 उमेदवार कागदपत्र तपासणीत अपात्र ठरले.

           परभणी जिल्हा पोलीस दलांतर्गत शिपाई पदाच्या 111 जागांकरीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत क्रीडा संकुलात भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरती प्रक्रियेकरीता  पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी 500 उमेदवार बोलावण्यात आले होते पैकी 342 उमेदवार हजर झाले. त्यातून 281 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले. तर शारिरिक मोजमाप व कागदपत्रे तपासणीत 61 अपात्र झाले. तसेच दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.20) 501 उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी 354 उमेदवार हजर झाले.  त्यातून 295 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले तर शारिरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत 59 उमेदवार अपात्र ठरले, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या