🌟परभणी जिल्हा पोलिस दलातील पोलीस शिपाई भरतीसाठी 281 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र.....!


🌟जिल्हा पोलिस दलांतर्गत पोलीस शिपाई आणि चालकांच्या जागांसाठी प्रक्रिया सुरू🌟

परभणी (दि.19 जुन 2024) : परभणी जिल्हा पोलिस दलांतर्गत पोलिस शिपाई व चालक या दोन पदांसाठीच्या भरतीची प्रक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत क्रीडा संकुलात आज बुधवार दि.19 जुन 2024 रोजी सुरू झाली असून पहिल्या दिवशी 281 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले.

            या भरती प्रक्रियेकरीता 500 उमेदवार बोलावण्यात आले होते पैकी 342 उमेदवार हजर झाले. त्यातून 281 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले. तर शारिरिक मोजमाप व कागदपत्रे तपासणीत 61 अपात्र झाले.  बुधवारपासून ही प्रक्रिया झाली असून पहिल्या टप्प्यात शारिरीक चाचणी तर दुसर्‍या टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या