🌟परभणी जिल्ह्यात सरासरी 2.7 मिलिमीटर पाऊसाची नोंद......!


🌟जितूर तालुक्यात सर्वाधिक 12.5 मिलिमीटर पाऊस🌟

परभणी (दि.28 जुन 2024) :- परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक 12.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1  जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे.  परभणी 1.9 (178.9), गंगाखेड 0.0 (170.3), पाथरी 1.1 (190.0), जिंतूर 12.5  (161.1), पुर्णा 1.1 (125.2), पालम 0.0 (138.6), सेलू 1.8 (148.2) सोनपेठ 0.0 (133.2) आणि मानवत तालुक्यात 0.8 (201.7) पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.

परभणी जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 28 जून 2024 पर्यंत सरासरी 161.1 मिलीमीटर पाऊस पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या 24 तासात सरासरी 3.5 मि.मी. (176.0) पावसाची नोंद झाली आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या