🌟परभणीत मराठा प्रवाह समिती कडून राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त 26 जून रोजी गुणवंतांचा सत्कार...!


🌟पालकांना नोंदणीचे अहवान : छत्रपती जीवन स्फूर्ती कार्यगौरव पुरस्कारासाठी निवड समिती स्थापन🌟

परभणी (दि.08 जुन 2024) : मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणार्‍या व्यक्तींना छत्रपती जीवन स्फूर्ती कार्यगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

              दरवर्षीप्रमाणे मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने 26 जून रोजी सकाळी 11 वाजता येथील बी रघुनाथ सभागृहात छत्रपती 10 वी (90 टक्के), 12 वी (90 टक्के)नीट (500) व इतर विशेष परीक्षेत नाविन्यपूर्ण गुण मिळवणार्‍या मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मराठा व्यक्तींना छत्रपती जीवनस्मृति कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी निवड समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून ही निवड समिती उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीचा शोध घेऊन आयोजन समितीला त्या व्यक्तींच्या नावाची शिफारस करणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी मराठा वधु-वर सुचक केंद्र जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयासमोर शिवाजीनगर परभणी येथे प्रत्यक्ष ऑफिस  किंवा धाराजी भुसारे (98 23 12 52 27), प्रा. अशोक उबाळे (94 0 54 90 77), संतोष कोल्हे (94 0 38 46 415), संचालिका वैशाली जाधव (75 0 70 54 862), संचालिका सौ. रेखाताई नायक (99 70 99 66 91) या मोबाईलवर 1 फोटो व गुण पत्रिका पाठवावी. परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे गुण घेतले असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगवेगळे 3 पुरस्कार देण्यात येतील. या कार्यक्रमात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठा समन्वय समितीच्या वतीने धाराजी भुसारे, सोपानराव शिंदे, भानुदासराव शिंदे, मंचकराव बचाटे, बाळासाहेब पवार, शामराव रणेर मंचकराव शेळके, गणेश क-हाळे, जयंवत गायकवाड, उज्वला पाटील, सौ महानंदा जाधव यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या