🌟डीएलएड प्रवेशासाठी 25 जूनपर्यंत मुदतवाढ : इच्छुकांनी अर्ज करण्याचे प्रवेश निवड समितीचे आवाहन....!


🌟असे आवाहन राज्यस्तरीय डी.एल.एड.प्रवेश निवड समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी🌟

परभणी (दि.20 जुन 2024) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 25 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्यस्तरीय डी. एल. एड. प्रवेश निवड समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

प्रथम वर्ष प्रवेशासाठी 18 जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक  संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी आता 25 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे  यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या