🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे ओबीसी समाजातर्फे करण्यात येणार उद्या शनिवार दि.22 जुन रोजी चक्काजाम आंदोलन.....!


🌟जिंतूर तालुका महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनास सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन🌟


परभणी (दि.21 जुन 2024) :  जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या शनिवार दि.22 जुन 2024 रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ओबीसी आरक्षण बचाव समितीने जिंतूरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

         गेल्या दहा दिवसांपासून हाके व वाघमारे यांच्यासह अन्य उपोषणार्थींची तब्येत खालावली आहे. परंतु, शासनाद्वारे त्या अनुषंगाने दखल घेतली जात नाही, अशी खंत ओबीसी समाज बांधवांनी एका बैठकीद्वारे व्यक्त केली व उद्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता जिंतूर येथील मार्केट यार्डातून वसंतराव नाईक चौकापर्यंत ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या संदर्भात जिंतूर तालुका महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनास सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या