🌟प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी प्रस्ताव आमंत्रित....!


🌟ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले🌟 

परभणी (दि.18 जुन 2024) : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. पाच ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या बालकांकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत.  

हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. संकेत स्थळाव्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पुरस्कारासाठी अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या