🌟शेतकऱ्यांनी खरीप 2024 साठी एक रुपयात पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे....!


🌟राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन🌟 


परभणी (दि.18 जुन 2024) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  

गत वर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1 कोटी 70 लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेतील वैशिष्ट पूर्ण बाबी विमा योजनेत समाविष्ट पिके भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14  पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या  शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी  शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची ई-पिकमध्ये नोंदणी करावी. 

* या योजनेत शेतकऱ्यांना शेतात घेतलेल्या पिकाचाच विमा घ्यावा :-

अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.  पिक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा.  पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे.

विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी  विभागास  रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे. विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसानहंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान यांचा समावेश आहे.

* विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने हे करावे :-

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास विमा काढता येणार आहे. ते बंधनकारक नाही. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांकाच्या किमान ७ दिवस आधी विमा हप्ता बँकेत न भरण्याबाबत लेखी कळविणे आवश्यक आहे. इतर बिगर कर्जदार शेतकत्याने आपला 7/12 चा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व पिक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने विमा योजनेत सहभागी व्हावे किंवा www.pmfby.gov.in सहाय्य घेता येईल.  योजनेत 15 जुलै 2024 पर्यंत सहभागी होता येईल. सर्वसाधारण पिक निहाय विमा संरक्षित रक्कम यात जिल्हानिहाय फरक संभवतो. 

ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, सोयाबीन, तीळ, कारळे, कापूस, कांदा पिकांसाठी संरक्षित पीक विमा राहणार आहे.  योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 किंवा संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या