🌟संपादक तथा संस्थापक बालासाहेब जगतकर यांच्याकडून सत्काराचे आयोजन🌟
परळी (दि.०१ जुन २०२४) - परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने दिनांक 15 जून 2024 रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून दहावी व बारावीनंतर काय या विषयावर मार्गदर्शन ही होणार असून या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ही तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने परळी शहरातील भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमा नगर इत्यादी नगरच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची कुणीतरी थाप मारावी जाने करून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्कार करण्यात येत असून दहावी बारावी नंतर काय या विषयावर अनेक मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार असून याही वर्षी दिनांक 15 जून 2024 रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे व दहावी व बारावी नंतर काय या विषयावर डॉक्टर प्राध्यापक इंजिनीयर वकील व पोलीस प्रशासन या विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुट्टी बौद्ध विहार येथे सदरील कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले असून या सत्कार समारंभास बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोची झेरॉक्स व दोन पासपोर्ट फोटो विशाल बनसोडे प्रेम जगतकर प्रशांत जगतकर व मनोज कांबळे यांच्याकडे जमा करावे असेही आव्हान करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या