🌟वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर न लावण्याची मागणी....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- कारंजा शहर व तहसील मध्ये महावितरण कडून आगामी काळात ४५ हजार स्मार्ट मीटर बसविले जाणार आहे,या प्रीपेड मीटरने जनतेची बेसूमार लूट होणार आहे.यामुळे वीज ग्राहकांसमोर बिकट समस्या निर्माण होणार आहे ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात उपकार्यकारी अभियंता कारंजा यांना २८ मे रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

 विस्तृत असे की,महागाईच्या काळात रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब जनतेला मात्र या प्रीपेड मीटर मुळे खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे,या पूर्वी वीज ग्राहकांला विज बिल भरण्याकरता विज बिल निघाल्यापासून चाळीस दिवस दिले जातात.मेहनत मजुरी करणारा वर्ग वीज बिल भरण्यासाठी मिळालेल्या वेळेत पैशाची जुळवाजुळव करून वीज बिल भरतात परंतु प्रीपेड मीटर लागल्यानंतर वीज ग्राहकांना  विजेची रक्कम आगाऊ भरावी लागणार आहे.अशा परिस्थितीत पैसे नसणाऱ्या वीज ग्राहकाला अंधारात राहण्याची वेळ येऊ शकते.त्याच बरोबर प्रीपेड मीटर लावल्याने महावितरण कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांचा रोजगार सुद्धा हिरावल्या जाणार आहे. मोबाईल नेटवर्क समस्या बऱ्याच भागात आहेत. अशा परिस्थितीत रिचार्ज न झाल्याने वीज वापरता येणार नाही. मध्यरात्री वीज संपल्यावर अंधारातच राहावे लागणार आहे.विद्युत प्रवाह कमी जास्त झाल्याने तांत्रिक बिघाड होऊन प्रीपेड मीटर नादुरुस्त झाल्यास किंवा जळाल्यास याबाबत महावितरण ने कोणतीही नीती घोषित केलेली नाही,त्यामुळे स्मार्ट मीटर मध्ये बिघाड झाल्यास एवरेज विज बिलचे प्रावधान आहे किंवा नाही याबाबत सुद्धा ग्राहकात संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे कारंजा शहर व तालुक्यात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य फारूक अली, शहर कार्याध्यक्ष नदीम राज,चांद भाई मुन्नीवाले, कय्यूम जट्टावाले,रज्जाक फकिरावाले,उस्मान खान,मुन्नाभाई ठेकेदार, मुजाहिद खान,सदिम नवाज,मो आरिफ दवला,मोहसिन शेख,अ राजिक,रेहान खान,हामिद शेख,वहिद शेख यांचे सह राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या