🌟परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली स्ट्राँग रूमची पाहणी.....!


🌟यावेळी त्यांनी औद्योगिक वसाहतीतील भारत निवडणूक आयोगाच्या गोदामाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला🌟


परभणी (दि.१६ मे २०२४) :  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँग रूमची आज गुरुवार दि.१६ मे रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पाहणी केली.

                 यावेळी त्यांंच्यासमवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, निवडणूक विभागाचे अव्वल कारकून दत्ता गिनगिने तसेच स्ट्राँग रूमच्या सुरक्षा कामी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी औद्योगिक वसाहत येथील भारत निवडणूक आयोगाच्या गोदामाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या